500 Rupee Note: 500 रुपयांच्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो? व्हायरल नोटेचं सत्य काय? वाचा सविस्तर

Fake 500 Rupees Note : प्रभु श्रीरामचंद्राचं छायाचित्र असलेली एक पाचशे रूपयांची नवी नोट सध्या चांगलीच चर्चेत आलीय. ही नोट २२ जानेवारीला लॉन्च होणार असल्याचं देखील बोललं जातंय. आरबीआयनं याबाबत काय म्हटलंय ते जाणून घेवू या.
500 Rupees Note
500 Rupees NoteSaam Tv
Published On

New 500 Rupee Note Fact Check

जसजसा रामलल्लाचा अभिषेक जवळ येतोय, तसतशी उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. अनेकजण या संधीचा पुरेपूर फायदा घेत आहेत. अलीकडेच असे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. राम मंदिराच्या नावाखाली दररोज फसवणूक होत आहे. आता राम मंदिराची प्रिंट असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली (Fake 500 Rupees Note) आहे. तुम्ही अशी नोट पाहिली आहे का? आरबीआयनं खरोखरच राम मंदिराचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट जारी केली आहे का, हे जाणून घेवू या. (latest marathi news)

प्रभु रामाच्या चित्रासह व्हायरल होत असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे छायाचित्र बनावट असल्याचं आढळून आलंय. नोटांवरील महात्मा गांधींचं चित्र बदलण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. महात्मा गांधी यांच्याऐवजी श्रीराम आणि धनुष्यबाण असलेली अशा प्रकारची कोणतीही नोट बाजारात येणार नसल्याची माहिती नोट प्रेसच्या सूत्रांनी दिलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नोटेवर कोणतं चित्र आहे

सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नव्या नोटेची चर्चा होतेय. पाचशे रुपयांच्या नोटेची छायाचित्रं देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पाचशे रुपयांच्या नव्या नोटेवर श्रीराम आणि धनुष्यबाणाचं चित्र असलेला व्हिडिओ व्हायरल होतो. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी नोट जारी होणार असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर होतेय.

बनावट नोटांना बळी पडू नये

आरबीआयच्या वेबसाईटवर बँकेच्या नोटांमध्ये करण्यात येणार्‍या बदलांबाबत अशी कोणतीही माहिती आढळलेली (fake note) नाही. आरबीआयने याची कोणतीही पुष्टी केलेली नाही. आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्याच्या 2000 रुपयांची नवीन मालिका 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचं चित्र असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट नोटांना बळी पडू नये.

500 Rupees Note
आयुष्यात या गोष्टी लक्षात ठेवल्यास दिवस-रात्र होईल पैशांची दुप्पटीने वाढ, वाचा Chanakya Niti On Money

बनावट नोट

एकीकडे ही नोट व्हायरल होत आहे, मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या ५०० रुपयांच्या नव्या नोटांच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट (Fake 500 Rupees Note) आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रासह 500 रुपयांच्या नव्या नोटांची मालिका जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून २०२२ मध्ये, आरबीआय सध्याच्या चलनात आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रांसह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत आहे, असं वृत्त आलं होतं. त्यानंतर या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. तेव्हाही आरबीआयने असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नसल्याचे सांगितले होते.

500 Rupees Note
Vastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना या चुका करु नका; पैशांची सतत भासेल कमतरता, करावा लागेल दारिद्रयाचा सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com