Maharashtra Politics: 'एक नोट एक वोट'...काय आहे रविकांत तुपकरांचा लोकसभेचा प्लान? राजू शेट्टींसोबत जाणार का?

Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे धोरण दिल्लीत ठरत असतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांना न्याय मिळावा यासाठी एक नोट एक वोट या धर्तीवर लोकसभा लढवणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

संजय जाधव

Maharashtra Politics

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण तयारीनिशी लढविणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. ते दरवेळी स्वतंत्र लढण्याची घोषणा करतात आणि ऐन वेळी कोणत्यातरी पक्षाशी युती करतात, त्यामुळे आमच्यासारख्यांचा बळी जातो, अशी टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे धोरण दिल्लीत ठरत असतं त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांना न्याय मिळावा यासाठी एक नोट एक वोट या धर्तीवर लोकसभा लढविणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावेळी ठरवलंय

राष्ट्रवादीडून हातकंणंगले मतदारसंघाची जागा राजू शेट्टींसाठी सोडली जाणार असे संकेत आहेत. त्यावर तुपकर यांनी, राजू शेट्टी सोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. दरवेळी ते स्वतंत्र लढण्याची घोषणा करतात अनेक वर्षांपासून आम्हालाही तयारी कराव्या लावतात, पण ऐनवेळी कोणत्यातरी पक्षाशी युती करतात व एक दोन जागा लढतात. त्यामुळे आमच्यासारख्यांना तयारी करणाऱ्यांचा बळी जातो. थांबावं लागत पक्षाचा आदेश पाळावा लागतो. असं अनेक वेळा झालं आहे. त्यामुळे यावेळेला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठरविले आहे. यावेळी आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची आहे. शेतकऱ्यांचा आदेश माझ्यासाठी शिरसावंत आहे. माझं न्यायालंय शेतकरी आहेत आणि आपण लोकसभेची निवडणूक लढवायची अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

Maharashtra Politics
Kalyan Politics: विकासकामांच्या उद्घाटनाला का डावललं जातंय? भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी बोलून दाखवली मनातली खदखद

शेतकरीच माझा पक्ष

गावगड्यातील शेतकरीच माझा पक्ष आहे. गावगड्यातील जे म्हणतील तेच मी करेन, तोच माझा पक्ष तेच निवडणूक तेच चिन्ह. शेतकरी सर्वसामान्य माणूस , प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही निवडणूक होणार आहे. यांचे राजकीय राजवाडे उध्वस्त करणे, हे सर्वसामान्य माणसाने ठरवलं आहे. त्यामुळे राजवाडा विरुद्ध गावगाडी अशी निवडणूक होणार आहे आणि लोकांच्या वर्गणीतून ही निवडणूक लढवली जाणार आहे.

महायुती, महाविकास आघाडीच्या आमंत्रणावरून ते म्हणाले, जर तर ला फार्स महत्त्व नसतं. सध्यातरी आम्ही सर्व शेतकरी स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलो आहोत. गावोगावांत उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल मिसाळवाडीत सभा झाली त्याठिकाणी एक लाख रुपये वर्गणी देण्यात आली आहे.

Maharashtra Politics
Akola Breaking News: नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, 70 हून अधिक प्रेक्षक जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com