Akola Breaking News: नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, 70 हून अधिक प्रेक्षक जखमी

Akola Breaking News: नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 70 हून अधिक लोक जखमी झाले झाल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातल्या दगडपारवा येथे ही दुर्घटना घडली आहे.
Akola Breaking News
Akola Breaking NewsSaam Digital
Published On

हर्षदा सोनोने

Akola Breaking News

नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 70 हून अधिक लोक जखमी झाले झाल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातल्या दगडपारवा येथे ही दुर्घटना घडली आहे. जखमींना तात्काळ अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात नमो चषक सुरू आहे. 12 ते 14 जानेवारी दरम्यान या ठिकाणी कब्बडी आणि बॉडी बिल्डिंगचे सामने ठेवण्यात आले होते. दरम्यान आज अंतिम सामने सुरू असताना हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी बांधण्यात आलेली गॅलरी अचानक कोसळली. यात 70 हून अधिक प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमींना बार्शीटाकळी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर काहींना अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola Breaking News
Nandurbar Accident: ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात! दोन वाहनांची समोरासमोर धडक; ४ जखमी

कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात 

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला. साक्रीहून नवापूरच्या दिशेने जाणारी तवेरा कार आणि विसरवाडीहून साक्रीच्याविरुध्द दिशेने जाणाऱ्या ओमनी कारला ओव्हर टेक करण्याच्या नादात धडक दिल्याने ही घटना घडली. या अपघातात ओमनी कार वाहनातील चार जण जखमी असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Akola Breaking News
Kalyan Politics: विकासकामांच्या उद्घाटनाला का डावललं जातंय? भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी बोलून दाखवली मनातली खदखद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com