बनावट प्रमाणपत्र दाखवत लाटल्या दिव्यांगांच्या नोकऱ्या; 719 सरकारी कर्मचारी तपासाच्या फेऱ्यात

Fake Disability Certificate Scam: महाराष्ट्रात बनावट अपंगत्वाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केलीय. खोट्या पद्धतीने अपंगत्व आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
Fake Disability Certificate Scam
Maharashtra government launches action after 719 employees are found using fake disability certificates for government jobs.saam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस

  • ७१९ सरकारी कर्मचारी सध्या तपासाच्या फेऱ्यात

  • अपंग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत अधिकृत माहिती दिली

महाराष्ट्रात नवा स्कॅम उघडकीस आलाय. दिव्यांगाच्या नोकऱ्याच काहींना लाटल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत सरकारी नोकरी मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला असून त्याविरोधात सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बनावट ७१९ कर्मचाऱ्यांनी बनवाट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवल्याची तक्रार सरकारकडे प्राप्त झालीय. त्यानंतर सरकारकडून करावाई करण्यात आलीय.

राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी विधानसभेत याबाबत माहिती दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार बापू पठारे यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अपंग कल्याण मंत्री सावे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी अनिवार्य करण्यात आलीय. अनियमितता दिसून आल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Fake Disability Certificate Scam
लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणती कागदपत्रे लागतात?

सरकारच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्या ७१९ कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार मिळालीय. मंत्री सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यात ७८, लातूरमध्ये २६ कर्मचाऱ्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यांनी विधानसभेत सांगितलं की पुणे जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्र दिल्यावरून २१ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदावरून निलंबित केलंय.

Fake Disability Certificate Scam
Ladki Bahin Yojana : २६ लाख अपात्र महिला अन् १४ हजार पुरूषांनी घेतला लाडकीचा लाभ, सरकारचं कोट्यवधींचं नुकसान

तसेच नंदुरबारमध्येही दोन कर्मचाऱ्यांना नोकवरीवरून हटवण्यात आलंय. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र बनावट आढळून आले आहेत किंवा ज्यांचे दिव्यांगता ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात आढळून येईल. त्यांना दिव्यांगजन अधिकार अधिनियम २०१६ च्या अंतर्गत कलम ११ नुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. सावे म्हणाले की, ९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सरकारी प्रस्तावात सर्व विभागांना अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण करण्याचे आणि ८ जानेवारी २०२६ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com