Manasvi Choudhary
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीसाठी ekyc अनिवार्य केली आहे.
ekyc कशी करायची? सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनेसाठी ekyc १८ नोव्हेंबरपर्यत करायची आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील घरच्या घरी ekyc करू शकता.
सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर ई केवायसीवर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. यानंतर तुमचे केवायसी झाले की नाही हे समजेल.
जर केवायसी पूर्ण झाले नसेल तर प्रोसेस सुरु होईल. यानंतर पती किंवा वडिलांचा आधार नंबर निवडायचा आहे. त्यानंतर ओचीपी येईल.
यानंतर जात प्रवर्ग निवडावा लागणार आहे. यानंतर डिक्लेरेशनवर क्लि करा. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची माहिती भरा.
यानंतर तुमचे केवायसी पूर्ण झाले आहे, असा मेसेज येईल. त्यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.