Manasvi Choudhary
आई होण्याचं सुख प्रत्येक महिलेसाठी खास असतं. प्रेग्नन्सीच्या काळात स्त्रीला असंख्य वेदना सहन करावा लागतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? प्रेग्नन्सीनंतर महिलेच्या शरीरात कोणते बदल होतात. गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि भावनिक बदल होताना दिसतात.
प्रेग्नन्सीनंतर स्त्रिच्या स्तनांत बदल होतो. छोट्या पुटकुळ्या येतात. बाळाच्या स्तनपानाचा कालावधी संपल्यावर ही पुटकळे आपोआप निघून जातात.
शरीरात झालेली रक्तवाढ आणि रक्ताभिसरण यामुळे गरोदरपणानंतर किडनीवर दाब येतो तसेच तुम्हाला सारखे लघवीला जावे लागते.
मिलानोफिस्ट एक प्रकारची पेशी आहे. जी शरीरात मिल्यंनीन तयार होण्यासाठी कारणीभूत असते ज्यामुळे त्वचेत बदल होतो त्वचेचा रंग बदलतो.
गरोदरपणानंतर स्त्रीचे केस गळतात. शरीरातील एस्ट्रोजन या संप्रेरकाची पातळी वाढते.
पोटावरची त्वचा ताणली गेल्यामुळे पोटावर व्रण असतात. या बारीक पांढऱ्या रेषा असतात ज्या पोटापासून ते ओटीपोटापर्यंत येतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.