दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सुका चारा अन् मुरघासाचे दर निश्चित

Maharashtra Government Dry Fodder Procurement Rates 2026: दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. सुका चारा प्रतिकिलो १२ रुपये, तर मुरघास ८ रुपये दराने खरेदी करण्यास मंजुरी. जाणून घ्या सरकारच्या निर्णयातील महत्त्वाच्या अटी.
Maharashtra government dry fodder procurement rates 2026
Maharashtra government dry fodder procurement rates 2026saam tv
Published On: 

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी सुका चारा आणि मुरघास खरेदीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सुका चारा प्रतिकिलो कमाल 12 रुपये, तर मुरघास प्रतिकिलो कमाल 8 रुपये दराने खरेदी करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निर्णयानंतर 30 ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील सरकार निर्णय जारी करण्यात आला आहे.

Maharashtra government dry fodder procurement rates 2026
Good News : मोठी बातमी !एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

2026 मधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत पाणी आणि चारा टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटाने सुका चारा आणि मुरघासाच्या खरेदीसाठी दर निश्चित करण्याची शिफारस केली होती. 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या शिफारशींना मान्यता देण्यात आली.

Maharashtra government dry fodder procurement rates 2026
Shocking : नाशिकमध्ये हृदयद्रावक घटना! पाणी भरलेल्या बादलीत पडून चिमुकलीचा मृत्यू

दरम्यान, चारा खरेदी करताना त्याच्या गुणवत्तेची विशेष काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सुका चारा चांगल्या दर्जाचा, आंबट किंवा कुबट वास नसलेला असावा. तसेच त्याला बुरशी, माती किंवा कीड लागलेली नसावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. सुका चारा खरेदी करताना ज्वारी आणि बाजरीला प्राधान्य देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच सुक्या चाऱ्यातील ओलाव्याचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra government dry fodder procurement rates 2026
Nilesh Rane: लायकीत राहायचं… निलेश राणे कडाडले, भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांना थेट सुनावलं!

मुरघास खरेदी करतानाही गुणवत्ता तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. खरेदी करण्यात येणारा मुरघास हवाबंद अवस्थेत असावा आणि त्याला कोणत्याही प्रकारची बुरशी लागलेली नसावी, असे सरकारच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. चाऱ्याच्या विविध घटकांची तपासणी करण्यासाठी पुणे, औंध यांसह सरकारमान्य प्रयोगशाळांमध्ये सुविधा उपलबद्ध करून देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, सुका चारा आणि मुरघासासाठी निश्चित केलेले दर हे वाहतूक खर्च वगळून आहेत. त्यामुळे वाहतूक खर्चासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी निश्चित केलेले वाहतूक दर यासाठी लागू राहणार आहेत. 2026-27 मधील दुष्काळाच्या कालावधीत या खरेदी दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

महत्त्वाचे दर :

- सुका चारा : कमाल 12 रुपये प्रति किलो (वाहतूक खर्च वगळून)

- मुरघास : कमाल 8 रुपये प्रति किलो (वाहतूक खर्च वगळून)

- सुक्या चाऱ्यात ओलाव्याचे प्रमाण : कमाल 15 टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.