Esakal: जागतिक घडामोडी अन् त्याचे तुमच्यावर होणारे परिणाम; सर्वकाही वाचता येणार एका क्लिकवर; वाचा सकाळचं नवं न्यूजलेटर

Esakal Newsletter: सकाळ माध्यम समूह आणि एपी ग्लोबले यांनी नवीन न्यूजलेटर सुरु केलं आहे. यामध्या तुम्हाला सर्व जागतिक पातळीवर घटना आणि त्यांच्या होणाऱ्या परिणामांची माहिती मिळणार आहे.
Esakal
EsakalSaam tv
Published On

सकाळ माध्यम समूह नेहमीच जगभरासह देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करते. वाचकांपर्यंत अचून माहिती पोहचावी, याची जबाबदारी सकाळने घेतले आहे. आता त्यानंतर सकाळ माध्यम समूह आणि आणि एपी ग्लोबलेतर्फे नवीन साप्ताहिक वितरित केले जाणार आहे. द ग्लोबल ब्रीफ असं या साप्ताहिक न्यूजलेटरचे नाव असणार आहे.

Esakal
Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

सध्याच्या काळात संपूर्ण जग परस्परावर अवलंबून असते. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटनांचा परिणाम अनेकदा स्थानिक पातळीवर होतो. दूर कुठे घडलेल्या घटनांचे पडसाद जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातही जाणवतात. त्यामुळेच जगभरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती असायलाच हवी. जागतिक घडामोडी, त्याचे परिणाम माहित करुन घेणे महत्त्वाचे झाले आहे. त्याचमुळे या नवीन न्यूजलेटरला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर आठवड्याला साप्ताहिक न्यूजलेटर प्रसिद्ध केले जाणार आहे. यामध्ये जगातील सर्व घडमोडी, धोरणात्मक निर्णय आणि त्याचे विश्लेषण, संबंधित तज्ज्ञांचे मत याबाबत सविस्तर माहिती असणार आहे. एखाद्या घटनेची तीव्रता, त्यामागील कारणे आणि परिणाम या सगळ्याचा आढावा यामध्ये असणार आहे.

Esakal
E - Sakal No 1 : डिजिटल विश्वात ई-सकाळची पुन्हा कमाल; नव्या वर्षांत सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर

प्रत्येक नागरिकासाठी हे न्यूजलेटर आवश्यक आहे. प्रत्येकाला अवघ्या काही क्लिकवर जगभरातील सर्व माहिती मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हे न्यूजलेटर उपयुक्त ठरणार आहे. याचसोबत अनेक तज्ज्ञांची मते आणि विश्लेषणे वाचायला मिळणार आहे.

Esakal
E-Sakal No1 Marathi News: महाराष्ट्रात आम्हालाच वाचकांची पहिली पसंती; डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ सलग दुसऱ्यांदा ठरला नंबर 1

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com