थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीत आज (शनिवार) सकाळच्या प्रहरी जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्यास प्रारंभ केला आहे. या भागात माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात आहे. यापूर्वी देखील या भागातील अतिक्रमणांवर प्रशासानाने हाताडाे मारला हाेता. (Maharashtra News)
महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार या परिसरामध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासन कारवाई करीत आहे. विशेषत: खिंगर, भोसे, भिलार गावातील अनधिकृत बांधकामे एकाच वेळी पोकलेन, जेसीबीने पाडण्यास प्रारंभ केला आहे.
साम टीव्हीने महत्त्वाच्या प्रश्नावर वाचा फाेडली
पाचगणी प्रमाणेच महाबळेश्वर, भिलार या डोंगर उतारावर असणाऱ्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा उत्तराखंडमधील जोशीमठ सारखीच स्थिती राज्यातील पाचगणी, महाबळेश्वर येथे निर्माण होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी साम टीव्हीशी बाेलताना यापूर्वी व्यक्त केली हाेती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान साम टीव्हीच्या वृत्ताची दखल घेत आज जिल्हा प्रशासनाने कारवाईस प्रारंभ केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.