Dharashiv News : खूद्द जिल्हाधिका-यांनीच सुरु केला वाळू विक्रीचा डेपाे; जाणून घ्या दर

एका क्लिकवर नागरिकांना वाळु खरेदी करता येणार आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
dr sachin ombase
dr sachin ombasesaam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

धाराशिव जिल्ह्यातील होणारी अवैध वाळू व्यवसायास लगाम बसावा यासाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथे शासकीय वाळु डेपो कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी या वाळु डेपोचा शुभारंभ केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवैध वाळु खरेदी न करता सर्वसामान्य नारगीकांनी शासकीय वाळु डेपोतुन वाळु खरेदी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर नागरिकांना वाळु खरेदी करता येणार आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. (Maharashtra News)

dr sachin ombase
Shirdi Sai Baba : नववर्षात भक्तांची मांदियाळी; साईचरणी तब्बल १६ कोटींचे दान

नागरिकांना केवळ ६६० रुपये प्रति ब्रास या दराने वाळु उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे अवैध वाळु उत्खनन आणि अवैध वाळू व्यवसायास आळा बसेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची सजवलेल्या बैलगाडीतुन मिरवणूक

दरम्यान धाराशिवच्या कळंब तालुक्यातील ईटकुर येथे महसुल व वन विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी नागरीकांना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते जात प्रमाणपत्रासह विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची सजवलेल्या बैलगाडीतुन मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमासाठी ईटकुर येथील नागरीक व स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

dr sachin ombase
Protest against Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचा निषेध... 'शरद पवार गटाचा पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही' (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com