Election Result 2023 : विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सुरुवातापासूनच चर्चेत राहिल आहे. त्यामुळे येथे सत्यजित तांबे की शुभांगी पाटील कोण विजयी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ४९.२८ टक्के मतदान झालं आहे. २ लाख ६२ हजार ६७८ मतदारांपैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केलं आहे.
अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील यांच्यात मुख्य लढत आहेत. एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी १,०२,४०३ मतदारांनी मतदान केलं आहे.विभागीय आयुक्तांसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत.
औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र १४ उमेदवारांमुळे ही निवडमूक बहुरंगी झाली असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आठ जिल्ह्यात ५३ हजार २५७ शिक्षक मतदारांच्या मतांची मोजणी होणार आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थीत नागो गाणार, महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात चुरस असेल. तर कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि भाजप शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात यांच्यात चुरस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.