Vidhan Parishad Election: 'जीत' सत्याची... निकालाआधीच सत्यजीत तांबेंच्या विजयाचे झळकले पोस्टर्स

नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहे. तांबे कुटुंबियांच्या रणनितीने अनेकांना धक्के बसले.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSaam TV
Published On

नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये झळकले आहे.

'जीत' सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये लागले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. असे पोस्टर्स नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी लावले आहे. (Latest Marathi News)

Satyajeet Tambe
Jitendra Awhad: मोठी बातमी! 'मला कोणत्याही क्षणी अटक होईल...' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहे. तांबे कुटुंबियांच्या रणनितीने अनेकांना धक्के बसले. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शुंभागी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यात मुख्य लढत आहे. तांबे यांचे विजयाचे पोस्टर्स लागले तरी काही तासात निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ४९.२८ टक्के मतदान झालं आहे. २ लाख ६२ हजार ६७८ मतदारांपैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केलं आहे. एकूण २८ टेबलवर मतमोजणी होणार आहे. कमी मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com