बोटावरची शाई पुसल्यानंतर पुन्हा मतदान करता येणार नाही; निवडणूक आयोग करणार कारवाई

Maharashtra Municipal elections : मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला जातोय. यानंतर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
polling day
election commissionSaam tv
Published On
Summary

29 महापालिकांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू

बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप

राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात मुंबईसह २९ महापालिकांमध्ये मतदानाची प्रक्रिया पाडली जात आहे. यंदा निवडणुकीत मतदान करून आल्यानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला जातोय. यावरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्याने दुबार मतदान केल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

polling day
बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळला, तर संबंधित व्यक्तीवर योग्य अशी कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

'एखाद्याने बोटावरची शाई पुसून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही. याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे.मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलीये. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाहीये. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आयोगाने पुढे म्हटलंय.

polling day
साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

'मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश जारी करण्यात आले होते. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जातोय. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने लावण्यात यावी. तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना याआधी देण्यात आल्यात. त्या मार्कर पेनवरही नमूद केल्यात. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन आयोगाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com