Pandharpur Wari 2023: मुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पंढरपूर पालिकेच्या सीओंना झापलं; नेमकं करणं काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रभागा नदी पलीकडील 65 एकर जागेची पाहणी केली.
Pandharpur Wari 2023
Pandharpur Wari 2023Saam Tv
Published On: 

Pandharpur News: आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शिंदे आणि पंढरपूर नगरपालिकेची सीईओ अरविंद माळी यांना चांगलेच झापले. कामात कुठलीही चूक केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. (Latest Marathi News)

Pandharpur Wari 2023
Buldhana Accident News: पोलिसाच्या कारची एसटीला धडक; ८ गंभीर जखमी, कारचा चक्काचूर

रात्री मुख्यमंत्री आषाढी यात्रेच्या तयारीच्या पाणीसाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी चंद्रभागा नदी पलीकडील 65 एकर जागेची पाहणी केली. या परिसरात रस्ते आणि पाण्याची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या होत्या. त्यावर तात्काळ मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि नगरपालिकेचे सीईओ अरविंद माळी यांना बोलावून या गैरसोयी विषयी जाब विचारला. (Pandharpur News)

Pandharpur Wari 2023
Mumbai Building Collapse : घाटकोपरमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माय-लेकाचा मृत्यू, काल खचली होती इमारत

अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याचे ऐकून मुख्यमंत्री चांगलेच संतप्त झाले. वारी तोंडावर आली असताना लोकांना पाणी मिळत नाही हे योग्य नाही. कामात कुचराई केल्यास कोणालाही सोडणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पंढरपूर (Pandharpur) दौऱ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com