एकनाथ शिंदेंच्या फोटोवर काळी जादू? घराबाहेर घडला प्रकार, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय?

Eknath Shinde Photo Black Magic Controversy: जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्ह्यात शिंदेसेना उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Alleged black magic materials found outside the house of a Shinde Sena Zilla Parishad candidate in Solapur district ahead of polling.
Alleged black magic materials found outside the house of a Shinde Sena Zilla Parishad candidate in Solapur district ahead of polling.Saam Tv
Published On

मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परीषदांच्या निवडणुकीने ग्रामीण भागातलं राजकीय वातावरण तापलंय. विजय मिळवण्यासाठी अनेक जण कोणत्याही थराला जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात उमेदवाराच्या पराभवासाठी चक्क जादूटोण्याचाही आधार घेतला जातोय. जिल्हा परीषदेच्या शिंदेसेना उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे उमेदवार आणि शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांच्या प्रचार पत्रकावर हळदी-कुंकू, लिंबावर सुई-टाचण्या लावल्याचा प्रकार घडलाय. गंभीर बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरही हळदी-कुंकू लावल्याचा प्रकार घडलाय.

दरम्यान ही घटना कळताच परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी शनिवारी 7 फेब्रुवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत २०१३ मध्ये कायदा करण्यात आला आहे. मात्र तरीही दुर्गम भाग असो किंवा निम शहरी पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचे प्रकार घडतच आहेत. काळी जादू नाही तर सूज्ञ मतदारांच्या निर्णयाने त्यांच्या मताने उमदेवाराचा जय-पराभव ठरतो. कोणतेही ठोस काम न करता अंधश्रद्धेवर विश्वास असणा-यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com