
कोल्हापूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही समावेश आहे. याचिकेत आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे यांचा नावाचा याचिकेत समावेश समोर आल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्याने मोठं भाष्य केलं आहे. तिच्या शरीरावर जखमा नव्हत्या, तर तिचा मृत्यू कसा झाला, असा सवाल शिंदे गटाचे नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान संजय शिरसाट यांनी विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरही भाष्य केलं. 'दिशा सालियान प्रकरण हे खूप गांभीर्याने घेण्यासारखं प्रकरण आहे. याचं राजकारण करू नका. त्या दिवशी घडलेली पार्टी. तिच्यावर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिला मारल्यानंतर ढकलून देण्यात आलं. दिशा सालियानच्या शरीरावर कुठलीही जखम नाही. मग तिचा मृत्यू कसा होतो, असा सवाल शिरसाट यांनी केला.
'तिच्या वडिलांनी सांगितलं की, पाच वर्ष दबावात होतो. दिशाचे वडील हायकोर्टात गेले आहेत. न्यायदेवता जो आदेश देईल, त्यानुसार कारवाई होईल. एखाद्या महिलेवर राजकीय दबाव टाकून अत्याचार होत असेल, तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, असं ते म्हणाले.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर म्हणाले की, 'सोमनाथ सूर्यवंशी यांचा मारहाणीत मृत्यू झाला, असा अहवाल असेल. तर यामध्ये दोष असेल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल'.
मुंबईच्या रस्त्याविषयी बोलताना शिरसाट म्हणाले, 'मुंबईतील रस्त्यांवरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जाते, ती पूर्णपणे चुकीची आहे. हातात झाडू घेऊन मुंबईचा रस्त्यावर उतरणारा मुख्यमंत्री संपूर्ण देशाने पाहिला आहे. एकनाथ शिंदेंना घेरणं इतकं सोप्पं नाही. सगळे साखळदंड तोडून बाहेर पडणारे लोक आहोत. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.