Prashant koratkar : कोर्टाचा दणका, प्रशांत कोरटकर फरार; पोलीस मुसक्या कधी आवळणार?

Prashant koratkar Latest news : छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोरटकर अटकेच्या भीतीने पसार झालाय...मात्र पोलीस संरक्षण असलेला कोरटकर कसा पसार झाला? आणि पोलीसांनीच कोरटकरला अभय दिलंय का? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....
Prashant Koratkar
Prashant KoratkarSaam tv
Published On

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर फरार झालाय.. त्यातच कोल्हापूर सत्र न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळून लावल्याने कोरटकरच्या अडचणी वाढल्यात.. मात्र तब्बल 22 दिवसानंतरही कोरटकरला अटक न केल्याने कोल्हेंनी हल्लाबोल केलाय.

Prashant Koratkar
Nagpur Faheem Khan VIDEO : हिंसाचाराआधी पोलिसांशी हुज्जत; मास्टरमाईंड फहीम खानचा आणखी एक व्हिडिओ समोर

25 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिली. यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.. त्यावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली..

त्यामुळे कोरटकरला पोलीस संरक्षण देण्यात आलं...त्यानंतरही कोरटकरने पोलीसांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली... एवढंच नाही तर कोरटकरने कोल्हापूर न्यायालयातून जामीन मिळवला.. त्यानंतर सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली.. तर न्यायालयाने पुन्हा कोरटकरच्या जामीनाचा चेंडू कोल्हापूर न्यायालयाकडे टोलवला.. त्यानंतर 18 मार्चला कोरटकरचा जामीन फेटाळण्यात आला.

Prashant Koratkar
Dombivli : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी कारवाईला वेग; खोटे कागदपत्र तयार करणाऱ्याला बसला पहिला दणका?

त्यामुळे कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूरच्या दिशेने निघालेत...मात्र भेदरलेला कोरटकर कोणत्या बिळात लपून बसलाय? याबरोबरच पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर पसार कसा झाला? कोरटकर फरार होत असताना पोलीस आंधळे झाले होते का? फरार असतानाही कोरटकरने मोबाईल पत्नीपर्यंत कसा पोहचवला? ? कोरटकरला पोलीसांचंच अभय आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत... त्यामुळे प्रश्न पोलीसांच्या कार्यक्षमतेचा आणि इभ्रतीचा असल्याने कोरटकरच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com