Thackeray Vs Shinde : शिंदे-ठाकरे गटात पुन्हा वादाची शक्यता; आणखी एक नाव गोठवलं जाणार?

शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या एक सारख्या नावाच्या मागणीमुळे संघर्षात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest Update
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest UpdateSAAM TV
Published On

रुपाली बडवे

Maharashtra Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठावल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे मूळ नाव शिवसेना देखील वापरता येणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयागोच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. तर शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे २ नावांचा प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही गटाच्या एक सारख्या नावाच्या मागणीमुळे संघर्षात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest Update
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या फेसबूक लाईव्हमधील ठळक मुद्दे

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे दिली आहेत. त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य ही चिन्ह देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे २ नावांचा प्रस्ताव पाठविण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' आणि 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' या दोन नावांचे प्रस्ताव पाठविण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest Update
चाळीस डोक्यांच्या रावणाने धनुष्यबाण गोठवलं; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' या नावाचा देखील प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने देखील 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' या नावाची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे (Election Commission) नवा पेच निर्माण होणार आहे. यामुळे निवडणूक आयोग आणखी एक नाव गोठवणार का, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, सदर नाव कोणाच्या पदरात पडणार ? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला सोमवारपर्यंत ३ नवी चिन्ह आणि ३ नव्या नावांचा प्रस्ताव देण्यास सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com