Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या फेसबूक लाईव्हमधील ठळक मुद्दे

मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं त्यांना मिळालं आहे. मात्र सर्वकाही देवून सुद्धा नाराज असल्याचं सांगून काही जण निघून गेले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam tV

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी आणि जनतेशी आज फेसबूकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शिंदे गटाववर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. सर्व देऊनही नाराज असल्याचं सांगून काही जण निघून गेले. पण आता ते शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray
मी म्हणजे राजा, हे वागणं बरं नव्हं; मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

>> तीन नावे आणि तीन चिन्हे ECकडे सादर: शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे दिली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच तीन चिन्हेही निवडणूक आयोगाकडे दिली आहेत. यामध्ये त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य ही तीन नावे दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. निवडणूक आयोगाये याबाबत आता लवकर निर्णय द्यावा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हणाले. (Latest Marathi News)

>> निवडणूक आयोगाच्या निर्णयाच आश्चर्य : मुळात न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रक्रियाधीन असताना निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच आश्चर्य वाटतं. जर ते अपात्र ठरले तर आज हे चिन्ह काही काळापुरत गोठवलं त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

>> काहींना शिवसेनाप्रमुख व्हायचंय : मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं त्यांना मिळालं आहे. मात्र सर्वकाही देवून सुद्धा नाराज असल्याचं सांगून काही जण निघून गेले. मात्र आता काही जणांना शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे.

>> शिवाजी पार्क मिळू नये म्हणून खोकेसूरांचे प्रयत्न : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हाला मिळू नये म्हणून खोकेसूरांनी प्रयत्न केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे. एक दसरा मेळावा साधा होता तर दुसरा पंचतारांकित होता. 40 डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामचंद्राचं धनुष्यबाण गोठवलं.

Uddhav Thackeray
'जहाज बुडालं तरी उद्धव ठाकरेंना वाटतय काँग्रेस, राष्ट्रवादी आपणाला वाचवेल'

>> शिवसेना संपवण्याचा प्रयत्न : शिवसैनिकांना दमदाट्या सुरू आहेत. आणीबाणीच्या काळातही हे झाले नाही. इंदिरा गांधींकडे तेव्हा प्रस्ताव गेला होता, शिवसेनेवर बंदी घाला. परंतु त्यांनी घातली नाही. मात्र तुमचा हेतू आता स्पष्ट झाला आहे, तुम्हाला शिवसेना संपवायची आहे. कॉंग्रेसने जे केलं नाही ते तुम्ही केलं.

>> शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले. शिवसेना वाढवण्यासाठी अनेकांची हात पुढे आले. अनेकजण आले, मेहनत घेतली. काहींना वाटत मीच केलं, असं नाहीये, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला. हिंदू अस्मिता जपली त्या शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात? काय मिळालं तुम्हाला? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com