घराला अचानक हादरे, मांडणीवरील भांडी पडली; भूकंपाच्या धक्क्याने लोक रस्त्यावर धावत सुटले

Marathwada earthquake update : भारतातील काही ठिकाणी आठवड्याभराने पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. यामुळे लोक भयभीत होऊन घराबाहेर पळाले.
earthquake update
Marathwada earthquake updateSaam tv
Published On
Summary

भारतातील काही शहरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

मराठवाड्यातील काही भागात भूकंपाचे हादरे

भूकंपाच्या हादऱ्याने लोकांची धावाधाव

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाच्या तीव्र धक्क्याने घर आणि पत्रे हादरले. तीव्र स्वरुपाच्या हादऱ्याने अनेकांच्या स्वयंपाकघरातील मांडणीवरील भांडी पडली. काही लोक भूकंपाच्या धक्क्याने घराबाहेर पळाले. महिला,पुरुष आणि लहान मुले घाबरून एका ठिकाणी जमा झाले. तर काही जण धावताना दिसले.

earthquake update
Rajasthan News: क्षणात अख्ख कुटुंब संपलं! विजेच्या धक्क्याने एकाच घरातील चौघांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील दिल्ली-एनसीआर, जम्मू आणि काश्मीर आणि चंदीगडसह काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर, पूंछ आणि काश्मीर खोऱ्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर या भूकंपाची रिस्टर स्केलवर 4.7 तीव्रतेची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. हिंगोली शहर, वसमत, कळमनुरी भागातील लोक भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत झाले. मराठवाड्यात शनिवारी सकाळी ८.४६ मिनिटाला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची माहिती हाती आली आहे.

earthquake update
Weather News : राज्यावर अवकाळीचे संकट कायम, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांना अलर्ट

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही नागरिक घराबाहेर आले. यावेळी काही लहान मुले भीतीने इतरत्र पळताना दिसली. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर एकत्र जमा झाले. मराठवाड्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

earthquake update
Maharashtra Weather : सूर्य आग ओकतोय! मुंबईसह अनेक जिल्ह्यांत उकाडा वाढला; आज कुठे कसं हवामान? वाचा

मराठवाड्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याने किती नुकसान झालं, याची माहिती हाती आलेली नाही. या भूकंपाच्या हादऱ्याने अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. प्रशासन विविध जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. दरम्यान, भारतात गेल्या ४ महिन्यात जवळपास ३ हून अधिकवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com