Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC ब्लास्ट प्रकरणी मोठी अपडेट; कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Dombivli MIDC Blast Latest Update: डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील कंपनीत झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली MIDC ब्लास्ट
Dombivli MIDC BlastSaamTv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील कंपनीत झालेल्या स्फोटात मोठी अपडेट समोर येत आहेत. डोंबिवली एमआयडीसी अमूदान कंपनी रिअॅक्टर ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता (Malati Pradeep Mehta) आणि मलय प्रदीप मेहता (Malay Pradeep Mehta) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

डोंबिवली एमआयडीसी फेस टूमधील अनुदान या कंपनीत (Dombivli MIDC Blast) काल (२३ मे) रिअॅक्टर ब्लास्ट झाला होतै. हा ब्लास्ट अतिशय भीषण होता. कंपनीचा आजूबाजूच्या चार ते पाच कंपन्यांना देखील या स्फोटाची झळ बसली आहे. या परिसरातील इमारतीच्या काचांना देखील तडे गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेत ६४ जण जखमी झाले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप देखील काहीजण कंपनीमध्ये अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या कामगारांचे नातेवाईक या कंपनीच्या बाहेर त्यांची वाट पाहत (Dombivli MIDC Blast Latest Update) आहेत. यंत्रणांकडून त्यांच्याबाबत काही माहिती मिळते का? याकडे डोळे लावून बसले आहेत. जखमींचा खर्च शासन करेल, तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

डोंबिवली MIDC ब्लास्ट
Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या 4 जूननंतर शिफ्ट करणार; दुर्घटनेनंतर उदय सामंत यांची माहिती

डोंबिवलीतील स्फोट झालेल्या कंपनीमध्ये बॉयलरला परवानगी देण्यात आली नव्हती, अशी धक्कादायक माहिती कामगार विभागाने दिलीय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीमध्ये रिॲक्टरचा स्फोट (Dombivli MIDC Blast Update) झालाय. या स्फोटाची झळ बाजूच्या सहा कंपन्यांना देखील बसली आहे. या कंपन्यांमध्ये अजूनही काही कामगार अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

डोंबिवली MIDC ब्लास्ट
Dombivali MIDC: डोंबिवली एमआयडीसी प्रशासनाचा निषेध; नागरिकांची रस्त्यांसाठी मुक निदर्शने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com