अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये २३ मे रोजी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू तर ६५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढला आहे, तर या दुर्घटनेत १७ जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
आता डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोटाला पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अकरावरून सतरावर पोहोचला आहे. २३ मार्च रोजी झालेल्या स्फोटात बारा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर नऊ कामगार बेपत्ता होते. बेपत्ता कामगारांपैकी पाच कामगारांची ओळख पटली आहे. आता मृ्त्यूचा आकडा १७ वर पोहोचला (Kalyan News) आहे.
स्फोटानंतर बेपत्ता असलेल्या पाच कामगारांचा शोध लागला आहे. तर इतर बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. मनीष दास, मनोज चव्हाण, रवी राजभर, भारत जैस्वार आणि विशाल पौडवाल (Dombivli MIDC Blast) या पाच कामगारांचा ओळख पटली आहे. या स्फोटामध्ये ६५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. स्फोटामुळे संपूर्ण कंपनी जळून कोळसा झाली होती. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
स्फोट झाल्यानंतर (Blast Case) अनेक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला होता. अनेक इमारतींच्या काचा देखील फुटल्या होत्या. डोंबिवलीतील एमआयडीसीत अमुदान कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटामुळे घटनास्थळी इतर दोन ते तीन कंपन्यांनाही आग लागली होती. घटनेनंतर कंपनीचा मालक फरार झाला होता. या स्फोटानंतर कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात (Dombivli) आली होती. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.