Dombivli Blast Case : डोंबिवलीतल्या स्फोटानंतर प्रशासनाला जाग; कंपन्यांच्या स्थलांतरणासाठी समितीची स्थापना, मात्र कारखानदारांचा विरोध

Dombivli Blast Case News: काही कारखाण्यांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र या कारवाईमुळे कारखानदारांनी आक्रमक होत मोर्चा काढला आहे.
Dombivli Blast Case News
Dombivli Blast Case Saam TV

डोंबिवलीमधील अमुदान कंपनीतल्या स्फोटानंतर राज्य सरकारला आता जाग आली आहे. डोंबिवलीतल्या कंपन्या हलवण्यासाठी उद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच काही कारखाण्यांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र या कारवाईमुळे कारखानदारांनी आक्रमक होत मोर्चा काढला आहे.

Dombivli Blast Case News
Dombivli Blast Case: डोंबिवली स्फोट प्रकरणी मोठी बातमी! कंपनी मालकाची सुटका

डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटानंतर काही कारखाण्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. शहरातील धोकादायक कारखाने तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलवले जाणार आहेत. राज्य सरकारने समितीला तीन आठवड्यांत याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश देखील दिले आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

प्रदूषण नियंत्रण मंडळानेही कारखाण्यांवर कारवाई सुरू केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे काही कारखानदारांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. डोंबिवली एमआयडीसीमधील शेकडो कारखानदारांनी मोर्चा काढला आहे.

डोंबिवली औद्योगिक परिसरातील कंपनी स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात आल्याने एमआयडीसीमधील शेकडो कारखानदारांनी मोर्चा काढला आहे, तसेच याचा निषेध नोंदवला आहे.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये गुरुवारी भयानक स्फोट झाला होता. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेमुळे डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई शहर हादरून गेलं. कोणी आपला पती गमवला तर कोणी आपली पत्नी आणि बहिण गमावली.

स्फोटानंतर अमुदान कंपनीच्या मालकाला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी कंपनीच्या मालकाला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशात आता प्रशासनाकडून कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. तसेच डोंबिवलीतल्या कंपन्या हलवण्यासाठी उद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Dombivli Blast Case News
Dombivli News: डोंबिवली पुन्हा हादरली! केमिकल ब्लास्टनंतर सिलिंडरचा भीषण स्फोट, आग शमवणारेच आगीच्या कचाट्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com