Dombivli Blast Case: डोंबिवली स्फोट प्रकरणी मोठी बातमी! कंपनी मालकाची सुटका

Dombivli Blast Case : अमुदान कंपनीचा मालक मलय मेहताला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज मलय मेहताला कोर्टात हजर करण्यात आलं. तर मलय यांच्या आईला घरीच राहू द्यावे, अशी सूचना न्यायालयाकडून देण्यात आली होती.
Dombivli Blast Case: डोंबिवली स्फोट प्रकरणी मोठी बातमी! कंपनी मालकाची सुटका
Dombivli Blast Case

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण: डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनी स्फोटप्रकरणी मालती मेहता याची सुटका करण्यात आलीय. अमुदान कंपनीचा मालक मलय मेहताला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज मलय मेहताला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने मलय मेहताला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर मालती मेहता यांची सुटका करण्यात आलीय.

मलय मेहताला २९ जूपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मानपाडा पोलीस ठाण्यात मलय मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा करण्यात आला होता. त्याचबरोबर या स्फोट प्रकरणात मालती मेहता यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. गुन्हे शाखेने नाशिकमध्ये ही कारवाई केली होती. मालती मेहता ह्या देवदर्शनासाठी जात होत्या, त्यावेळी गुन्हे शाखेने चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले होते.

मात्र या चौकशीत त्यांचा कंपनीशी कुठला संबंध नसल्याचं समोर आले आहे. पतीच्या मृत्यूनंतर कंपनी मुलाच्या नावावर आहे. त्यात त्यांचा कुठलाच संबंध नसल्याने पोलिसांनी चौकशी करत त्यांना घरी सोडले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालीय. गुरुवारी डोंबिवली एमआयडीसीमध्ये भयानक स्फोट झाला होता. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी अमुदान कंपनीच्या मालकाला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर याप्रकरणी कंपनीच्या मालकाला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

दरम्यान कल्याण सत्र न्यायालयात मालक मलय मेहतासह संचालक असलेल्या त्याच्या आईलाही कोर्टात हजर करण्यात येणार होतं. पण मलय मेहताची आई वयस्कर असल्याने त्यांना घरीच ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. मलय मेहताच्या आईला पोलिसांनी नाशिक येथून पोलिसांनी अटक केली होती. आरोपी आणि जनहित याचिका टाकणाऱ्या वकिलांनी विविध गोष्टींवर युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं.

Dombivli Blast Case: डोंबिवली स्फोट प्रकरणी मोठी बातमी! कंपनी मालकाची सुटका
Dombivli Blast Case : डोंबिवली स्फोट प्रकरणाची मोठी अपडेट; अमुदान कंपनीच्या मालकाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com