Dombivali News
Dombivali NewsSaam tv

Dombivali News: रील काढणे बेतले जीवावर; पंप हाऊसमधील विहीरीत पडून तरूणाचा मृत्यू

रील काढणे बेतले जीवावर; पंप हाऊसमधील विहीरीत पडून तरूणाचा मृत्यू
Published on

अभिजीत देशमुख

डोंबिवली : सोशल मीडियावर रिल काढून अपलोड करण्याचे फॅड आले. अनेकदा हे रिल्स बनवताना वाद विवाद तर कधी अपघात झाले आहेत. असाच एक प्रकार डोंबिवली (Dombivili) जवळील ठाकुर्लीमध्ये समोर आला आहे. डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील पंप हाउसमधील खोल विहीरीत पडून मृत्यू एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नुरेन शेख असे खोल विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

Dombivali News
Sambhajinagar News: १ जुलैपासून मुंबईसाठी सायंकाळचे विमान

मुंब्रा येथे राहणारा २२ वर्षीय नुरेन शेख हा दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंप हाउस येथे रिल काढण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल विहिरीत पडला. हे पाहून त्याचे दोन मित्र जवळील रेल्वे सुरक्षा बलाकडे गेले. मित्रांनी माहिती देताच रेल्वे सुरक्षा बलाने विष्णूनगर पोलिसांना कळविले. विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ अग्निशामक दलाचा माहिती दिली.

Dombivali News
Ashadhi Wari 2023: वारीत दिसला जातीय सलोखा; मुस्लिम तरुणांनी दिला पालखीला खांदा

३२ तासानंतर मृतदेह हाती

रील काढताना नुरेन विहिरीत पडला. दरम्यान त्याच्या दोन मित्रांनी ही माहिती शनिवारी विष्णूनगर पोलिसांनी दिली होती. माहिती मिळताच पोलीस व फायर अधिकाऱ्यांनी तरुणाचा शोध सुरू केला होता. तब्बल ३२ तासाच्या शोध मोहिमेनंतर (Fire Brigade) अग्निशामक दलाच्या जवानांनी विहिरीतून तरुणाचा मृतदेह शोधून काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com