नागपूरात रंगलीय भुताची चर्चा; भुत सीसीटीव्हीत कैद!

नागपूरच्या शताब्दी नगर भागात सध्या एका भुताच्या अफवेची खूप चर्चा आहे. राजेंद्र मेश्राम यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसली.
नागपूरात रंगलीय भुताची चर्चा; भुत सीसीटीव्हीत कैद!
नागपूरात रंगलीय भुताची चर्चा; भुत सीसीटीव्हीत कैद!संजय डाफ
Published On

संजय डाफ

नागपूर : नागपूरच्या Nagpur शताब्दी नगर भागात सध्या एका भुताच्या Ghost अफवेची खूप चर्चा आहे. राजेंद्र मेश्राम यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये CCTV एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसली.

त्यांनतर मेश्राम कुटुंबीयांनी हे भूत असल्याचा दावा केला आणि परिसरात इतरांना माहिती दिली. मात्र, स्थानिकांनी आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ती प्रतिमा प्लास्टिकची पिशवी असल्याचं सांगत मेश्राम कुटुंबियांचा दावा फेटाळून लावलाय.

हे देखील पहा-

राजेंद्र मेश्राम हे नागपूरच्या शताब्दी नगरमध्ये राहतात. व्यवसायाने ऑटो चालक आहे. त्यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये 19 जुलैला रात्री साडेबारा वाजता एक प्रतिमा कैद झाली. सीसीटीव्हीमध्ये एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसत आहे. त्यांनतर मेश्राम कुटुंबीयांनी हे भूत असल्याची भीती मनात धरली. त्यांच्या घरा शेजारी एक पडके घर आहे त्यात कोणी राहत नाही. त्याच घराच्या बाजूला एक विहीर आहे काही वर्षा आधी एका मुलीने तेथे आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यामुळं या भागात भूत असल्याची अफवा पसरली.

नागपूरात रंगलीय भुताची चर्चा; भुत सीसीटीव्हीत कैद!
ऑगस्टपासून Facebook, Twitter मध्ये होणार मोठे बदल!

मात्र अंनिस ने हा दावा खोडून काढला. अंनिस चे हरीश देशमुख यांनी मेश्राम यांच्या घरी भेट दिली. त्यांच्याघरचे सीसीटीव्ही चे फुटेज चेक केले. यात दिसणारी ही प्रतिमा नसून एखादी वस्तू किंवा पक्षी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भूत कुठंही अस्तित्वात नाही ते लोकांच्या डोक्यात आहे असं सांगत जर कुणी हे भूत असल्याचं सिद्ध केल्यास 25 लाखांचं बक्षीसही त्यांनी जाहीर केलं.


Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com