Dhule News : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दुर्दशा उघड; नातेवाईकांनी धक्का मारून केली गाडी सुरू

Dhule Shirpur News : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 102 क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिका सुरूच न झाल्याने नातेवाईकांना धक्का मारावा लागला. गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
Dhule News : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दुर्दशा उघड; नातेवाईकांनी धक्का मारून केली गाडी सुरू
Dhule NewsSaam Tv
Published On
Summary
  • शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 102 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरूच झाली नाही

  • गंभीर रुग्णांना धुळे येथे हलवताना नातेवाईकांना गाडीला धक्का मारावा लागला

  • निष्काळजीपणामुळे नागरिकांत संताप, शासनावर जबाबदारी टाकली

  • नवीन व कार्यक्षम रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी

शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. तातडीच्या उपचारासाठी गंभीर रुग्णांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी 102 क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका मागवण्यात आली, तेव्हा ती सुरू करण्यासाठीच नातेवाईकांना धक्का मारावा लागला. या धक्कादायक घटनेमुळे रुग्णवाहिकांच्या दुरवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शिरपूरजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. याचबरोबर बोराडी गावातील १० वर्षीय अमित रवींद्र पावरा या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. त्यालाही शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने धुळे येथे हलवण्याची शिफारस केली.

Dhule News : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दुर्दशा उघड; नातेवाईकांनी धक्का मारून केली गाडी सुरू
Dhule : बाभळे जलशुद्धीकरण केंद्र रामभरोसे; तळीरामांच्या सर्रास पार्ट्या, कुत्र्यांचाही वावर

दोन्ही गंभीर रुग्णांना एकाच रुग्णवाहिकेतून धुळे येथे पाठवण्यात येत असताना उपजिल्हा रुग्णालयातील 102 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरूच झाली नाही. अखेरीस नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला धक्का मारत गाडी सुरू केली आणि मगच ती पुढे मार्गस्थ झाली. एका बाजूला गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात असताना अशा प्रकारे जुनी व निकृष्ट स्थितीत असलेली रुग्णवाहिका वापरावी लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

Dhule News : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दुर्दशा उघड; नातेवाईकांनी धक्का मारून केली गाडी सुरू
Dhule Tourism : धुळे जिल्ह्यातील २ सुंदर धबधबे, मिळेल स्वर्गसुखाचा अनुभव

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडल्यास रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती कायम राहते. धुळेपर्यंतचा प्रवास मोठा असून रुग्णवाहिका जर प्रवासादरम्यान बंद पडली तर डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांशिवाय रुग्णाचा जीव धोक्यात येईल. त्यामुळे शासनाने तत्काळ लक्ष घालून अशा नादुरुस्त रुग्णवाहिका परत मागवून नवीन व सक्षम रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Dhule News : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दुर्दशा उघड; नातेवाईकांनी धक्का मारून केली गाडी सुरू
Dhule Waterfall: पुढच्या विकेंडचा प्लान आताच करा; धुळ्यातील 'या' धबधब्यावर भिजण्याची मजा काही वेगळीच आहे

ही घटना फक्त शिरपूरपुरती मर्यादित नसून अशा अनेक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशाच समस्या आहेत. रुग्णवाहिका सेवा ही रुग्णांसाठी जीवनदायी ठरायला हवी, मात्र तीच मृत्यूचे कारण ठरू नये यासाठी शासनाने जबाबदारीने पावले उचलणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com