Dhule : बाभळे जलशुद्धीकरण केंद्र रामभरोसे; तळीरामांच्या सर्रास पार्ट्या, कुत्र्यांचाही वावर

Dhule News : अमृत दोन योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात येणार असून, तेथील बहुतांश विकास कामे हे धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या अंतर्गत मार्गी लावणार
Dhule News
Dhule News Saam tv
Published On

धुळे : धुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बाभळे जलशुद्धीकरण केंद्राची सध्या दयनीय अवस्था बघावयास मिळत आहे. या ठिकाणी सर्रासपणे श्वानांचा वावर केंद्राच्या परिसरामध्ये आणि पाण्याचे शुद्धीकरण होणाऱ्या ठिकाणी बघावयास मिळत आहे. इतकेच नाही तर कुठल्याही प्रकारचा सुरक्षारक्षक तैनात नसल्यामुळे मद्य प्राशन करणाऱ्या तळीरामांची देखील या ठिकाणी वारी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

धुळे शहरात पाणी पुरवठा बाभळे जलशुद्धीकरण केंद्रावरून करण्यात येत असतो. दरम्यान अमृत दोन या योजनेच्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत बाभळे जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांना गती मिळणार असल्याचे धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये बाभळे जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव बघावयास मिळत आहे. 

Dhule News
Wardha : वर्धा जिल्ह्यात लवकरच पालकमंत्री हेल्पलाईन; पंकज भोयर यांची घोषणा

प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 
जलशुद्धीकरण केंद्राकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाकपणा करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांतर्फे करण्यात येत आहे. शिवाय याठिकाणी तळीरामांच्या होत असलेल्या पार्ट्याना देखील आळा बसणे गरजेचे आहे.  

Dhule News
Pimpri Chinchwad : बांधकाम पाडले तर बाळाला फेकून आत्महत्या करेल; अतिक्रमण विरोधी पथकाला धमकावत शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

सुरक्षा भिंत बांधली जाणार 

जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या ठिकाणी श्वानांचा मुक्तपणे संचार जलशुद्धीकरण केंद्र जवळ बघावयास मिळत आहे. या ठिकाणी श्वान पाण्यात पडून दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याची भीती नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व बाबी सुरक्षा भिंत तयार झाल्यानंतर आटोक्यात येतील असा विश्वास धुळे महानगरपालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तसेच सीसीटीव्ही देखील लावले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com