Surabhi Jayashree Jagdish
नवादेवी धबधबा धुळे हा उत्तर महाराष्ट्रातील एक सुंदर आणि कमी प्रसिद्ध असलेला धबधबा आहे.
पावसाळ्यात तो पूर्ण प्रवाहात वाहतो आणि त्याचं सौंदर्य अनुभवण्यासाठी स्थानिक ट्रेकर्स व निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
संपूर्ण डोंगररांगांमधून वाहणारा उंच धबधबा, पावसाळ्यात खूपच आकर्षक दिसतो.
आसपास सह्याद्रीच्या लहानशा रांगा आणि घनदाट जंगल असल्यामुळे हवामान थंड आणि आल्हाददायक असतं.
धुळे शहरातून साक्री तालुक्याकडे जा. साक्री – नवादेवी हे अंतर सुमारे २५ किमी आहे.
साक्रीहून थेट नवादेवी गावापर्यंत वाहनाने पोहोचता येतं. नवादेवी मंदिराजवळून चालत थोडसं जंगल पार केलं की, धबधब्याजवळ पोहोचता येतं
मुंबई पासून या धबधब्याचं अंतर 340 ते 360 किमी आहे.