धुळ्यातील साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरात धक्कादायक घटना
जंगलात सापडला तरुण तरुणीचा मृतदेह
प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा अंदाज
पोलीस तपास सुरु
भूषण अहिरे, धुळे
धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरातील शिवाऱ्या डोंगर भागात १८ वर्षीय तरुणी आणि २३ वर्षीय तरुणाचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पल्लवी बहिरम आणि अरुण चौरे अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर पल्लवी घरात झोपली होती. मात्र, सकाळी ती घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान अरुणने मध्यरात्री एका व्यक्तीला मेसेज पाठवल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवाऱ्या डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू केली.
शोध घेत असताना दोघेही गंभीर अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथे दाखल केले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असून घटनास्थळाचा पंचनामा, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.