पोलीस प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी 55 लाखांचा महाघोटाळा; चार लोकसेवकांना ठोकल्या बेड्या

Police Training Centre Scam: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात १.५५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी चार शासकीय कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Police Training Centre Scam
Police investigate the alleged ₹1.55 crore government fund scam at the Dhule Police Training Centre saam tv
Published On
Summary
  • धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात १ कोटी ५५ लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या कथित अपहाराचे प्रकरण समोर आलाय.

  • या प्रकरणात चार लोकसेवकांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणूक आणि निधी अपहाराचा तपास सुरू

भूषण अहिर, साम प्रतिनिधी

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते, त्याच संस्थेत कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या चार लोकसेवकांनी संगनमत करून तब्बल 1 कोटी 55 लाख रुपयांचा शासकीय निधी लाटल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Police Training Centre Scam
Teacher Attack: शाळेत भरदिवसा रक्तरंजित थरार, टीसीच्या वादातून १७ वर्षीय मुलाचा शिक्षकावर हल्ला, धक्कादायक कारण समोर

याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये फसवणूक आणि शासकीय रकमेच्या अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चारही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत या कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन 'सेवार्थ' वेतन प्रणालीत बेकायदेशीरपणे फेरफार करत, कोणतेही देय नसताना स्वतःच्या बँक खात्यांमध्ये खोटा बेसिक एरियर्स जमा करून शासनाची मोठी फसवणूक केली आहे.

Police Training Centre Scam
Mumbai : उत्तराखंडमध्ये बसून मुंबईच्या तरुणांची फसवणूक, नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी उकळले; ११ जण अटकेत

जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता पुढील सखोल तपास आता धुळ्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून, पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

वाशिममधील ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा

वाशिममधील ९ पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी कस्टडीमध्ये असलेल्या आरोपीला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता. यात दोषी असलेल्या ९ पोलिसांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. सर्व दोषी पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. रिसोड पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी बेग्या पवार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. बेग्या पवार याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची त्याच्या आई-वडिलांनी माहिती दिली आहे. बेग्या पवार हा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा येथील पारधी समाजाचा होता. १० मे २०११ रोजी पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com