Dhule News: आमदार बोंडेंच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध; युवा सेनेकडून निषेध आंदोलन

आमदार बोंडेंच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध; युवा सेनेकडून निषेध आंदोलन
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On: 

धुळे : शिवव्याख्यानात व्यत्यय आणून व्याख्यात्यांना शिविगाळ केल्याने भाजपचे खासदार अनिल बोडेंचा (Anil Bonde) युवा सेनेने धुळ्यात (Dhule News) निषेध नोंदवला आहे. (Breaking Marathi News)

Dhule News
Jalna News: तहसिल कार्यालयात घुसून तहसीलदारावर प्राण घातक हल्ला; वाळू माफियांची मुजोरी

अमरावती येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे तुषार उमाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी छत्रपती शिवरायांवरील भाषण सहन न झाल्याचे भाजपचे खासदार अनिल बोडेंनी उमाळेंबद्दल अपशब्द वापरले. असा आरोप लावत भाजपा दरवेळी शिवरायांचा अपमान करतं आले असल्याचा देखील आरोप युवसेनेच्या निषेधकर्त्यांतर्फे लावण्यात आला आहे.

बोंडेनी माफी मागावी

धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात एकत्र जमलेल्या युवासैनिकांनी बोडेंच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध केला. त्याच बरोबर बोंडेंच्याच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करत निषेध केला आहे. बोडेंनी शिवव्याख्यात्यांची माफी मागावी, अन्यथा शिवप्रेमी आणखी आक्रमक होतील, असा इशाराही युवासेनेने यावेळी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.