धुळे : केंद्र सरकारतर्फे पारित करण्यात येत असलेला हिट अँड रन कायद्याविरोधात द बस ड्रायव्हर ग्रुप धुळे (Dhule) जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे, (Live Marathi News)
हिट अँड रन कायद्याला चालकांकडून विरोध करण्यात येत आहे. मागील आठवड्यात या विरोधात संप पुकारण्यात आला होता. यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा ट्रक, टॅक्सी चालकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार धुळ्यात देखील निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा; अशी मागणी देखील यावेळी या संघटनेच्या निदर्शने कर्त्यांनी केली असून, या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे,
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य एकत्र जमल्याचे बघायला मिळाले आहे. हा कायदा रद्द करण्यासंदर्भात मागणी मान्य केली नाही; तर यापुढे देखील हा संप अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.