धुळे : धुळ्यात कांदा प्रश्न पेटला असून केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरुद्ध ठाकरे गट शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गट शिवसैनिकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर (Onion) कांदे फेकून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. (Latest Marathi News)
कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विरोधात राज्यभरात आंदोलन करत निर्णयाचा निषेध केला जात आहे. त्यानुसार धुळ्यात देखील ठाकरे गट शिवसेनेने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा आणत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी (Shiv Sena) आक्रमक शिवसैनिकांनी कांदे फेकून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन देखील केले,
निर्णय रद्दची केली मागणी
पोलिसांनी तात्काळ आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेतले असून यावेळी संतप्त ठाकरे गट शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांविरोधात घेतलेला निर्णय रद्द करावा अशी यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.