MSEDCL News
MSEDCL NewsSaam tv

Dhule News: सणासुदीच्या काळात वीज खंडित; शिवसैनिकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव

सणासुदीच्या काळात वीज खंडित; शिवसैनिकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव
Published on

धुळे : सणासुदीच्या काळामध्ये शहरात वीज वितरण विभागाच्या (MSEDCL) मार्फत थकीत वीज बिल धारकांचे वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात रीक्षामधून अनाउन्समेंट केली जात आहे. सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांना विज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट करण्याचा धाक दाखवून वेठीस धरल्यावरून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. (Live Marathi News)

MSEDCL News
Nandurbar News: ज्वेलर्स दुकान फोडून पाच किलो चांदी लंपास; 24 तासात आरोपी अटक

वीज वितरण विभागातर्फे सक्तीची वसुली करू नये तसेच शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव रोखण्यात यावा. या संदर्भात देखील (Shiv Sena) शिवसेनेच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सूचित करण्यात आले आहे. सक्तीची (Dhule News) वसुली त्याचबरोबर विजेचा सुरू असलेला लपंडाव थांबवला नाही. तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी

थकित बील असलेल्‍या ग्राहकांचे वीज कनेक्शन कट केले जाईल, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. या विरोधामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव घातला. सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांना विज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट करण्याचा धाक दाखवून वेठीस धरल्यावरून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com