Nandurbar News: ज्वेलर्स दुकान फोडून पाच किलो चांदी लंपास; 24 तासात आरोपी अटक

ज्वेलर्स दुकान फोडून पाच किलो चांदी लंपास; 24 तासात आरोपी अटक, चांदीचे दागिने हस्तगत
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : शहादा शहरातील रत्नलाभ ज्वेलर्स दुकानातून ५ किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या घटनेचा (LCB) स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने २४ तासाच्या आत तपास लावत दोन्ही चोरट्यांना जेरबंद करीत मुद्देमाल जप्त केला. (Letest Marathi News)

Nandurbar News
MNS News : 'मनसे' च्या पदाधिका-यांना अटक, न्यायालयानं सुनावली पाेलिस काेठडी

सोनाराचे दुकान फोडून तब्बल पाच किलो चांदीचे दागिने चोरून (Crime) नेल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (Nandurbar LCB) स्थानीक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तीन पथके तैनात करून चौकशी केली.

फरार होण्याच्या तयारीत होते आरोपी

शहादा (Shahada) येथील घरफोडीतील संशयीत आरोपी अली उर्फ बबलु खान अफजल खान पठाण हा प्रेस मारूती मंदीराजवळ राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला. संशयीताला पोलीसांची कानघून लागली असता तो फरार होण्याच्या तयारीत असतांना पोलीसांनी त्याला शिताफीने पकडले. त्यानंतर त्याच्या साथीदार विक्की सुर्यवशी यास सालदार नगर येथून ताब्यात घेण्यात आले. संशयीतांना अटक करून चौकशी केली असता शहादा येथील पहनावा फैशन या कपड्याच्या दुकानातून चोरी केल्याची कबूली त्यांनी दिली अन दुसरा गुन्हा उघडकीस आला आहे.

पाच किलो चांदी हस्‍तगत

पोलीस सूत्रानुसार अली उर्फ बबलु खान अफजल खान पठाण राहणार प्रेस मारूती मंदीरजवळ शहादा व विक्की संजय सुर्यवंशी (रा. सालदारनगर, शहादा) यांना पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून ५ किलो चांदी हस्तगत करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गौरे, पोलीस नाईक विकास कापुरे, विजय ढिवरे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com