Dhule Bajar samiti Election
Dhule Bajar samiti ElectionSaam tv

Dhule Bajar samiti Election: कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व

कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व
Published on

धुळे : राज्‍यात कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या झालेल्‍या काही जिल्‍ह्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यात (Dhule) धुळे कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीवर (Bajar Samiti) पुन्‍हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व राखले आहे. कार्यकत्‍र्यांनी येथे मोठा जल्‍लोष केला. (Live Marathi News)

Dhule Bajar samiti Election
Maharashtra Politics: पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच! जयंत पाटलांच्या दाव्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

राज्‍यातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणुकांमध्‍ये अनेक दिग्‍गजांची प्रतिष्‍ठा पणाला लागली होती. मतदानाच्‍या दिवशी सर्वच पक्षांचे मोठे नेते मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. प्रामुख्‍याने शिंदे– भाजप युती व महाविकास आघाडीच्‍या पॅनल यात वर्चस्‍वाची लढाई होती. त्‍यानुसार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Dhule Bajar samiti Election
Jalgaon Crime News: चारित्र्याचा संशय; मुलाने जन्मदात्रीला संपविले

१० पेक्षा जास्‍त जागांवर विजय

धुळे कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या १६ पैकी जवळपास १० पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यापूर्वी देखील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा वर्चस्व असताना पुन्हा एकदा या निवडणुकीत देखील काँग्रेसचा वर्चस्व कायम ठेवले आहे. विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com