Leopard Attack: बिबट्याची दहशत वाढली; म्हशीच्‍या पारडूचा पाडला फडशा

बिबट्याची दहशत वाढली; म्हशीच्‍या पारडूचा पाडला फडशा
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On: 

धुळे : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे बिबट्याची दहशत बघावयास मिळत आहे. बिबट्याने (Leopard) शेतातील म्हशीचे पिल्लाचा फडशा पडला आहे. यामुळे परिसरातील (Farmer) शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Maharashtra News)

Leopard Attack
Accident News: कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील शेतकरी नितीन नारायण बडगुजर यांच्या शेतात बैल, म्हशी व पारडू बांधले होते. रात्री नेहमीप्रमाणे शेतात गूरे बांधलेली होती. मात्र सकाळी त्यांचा मुलगा दीपक बडगुजर हा शेतात म्हशीचे दूध काढण्यासाठी लवकर गेला. यावेळी त्यास म्हशीचे पारडू विचित्र अवस्थेत ठार झालेले दिसले. या ठिकाणी बिबट्याचे पावले देखील दिसून आले आहेत.

थाळनेर परिसरात यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचा वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दाहशतीमुळे मजूर देखील शेतीकामास येण्यास भीत आहेत. यामुळे वन विभागाने (Forest Department) या बिबट्याच्या बंदोबस्त लवकरात लवकर करावा; अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com