Accident News: कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Accident News
Accident NewsSaam tv
Published On: 

मुंबई : मुंबई– गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे कार आणि दुचाकीत भीषण अपघात झाला. या (Accident) अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. (Tajya Batmya)

कृष्णा बळीराम गवस (वय ३५, रा. दोडामार्ग, सासोली हेदूसवाडी) असे मृताचे नाव आहे. मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. या अपघातात तो जागीच कोसळला व गंभीर इजा झाली.

Accident News
Kalyan News: कपडे व्यापाराच्या नावाखाली खाली बनावट दारूची तस्करी; १६ लाखांच्या बनावट दारू जप्‍त

स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. कार चालक राहील जहिर दादला अंधेरी, मुंबई याला चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com