Subhash Bhamre
Subhash BhamreSaam tv

राज्‍यातील सत्‍तेत दोन दिवसात बदल; भाजप खासदार भामरे

राज्‍यातील सत्‍तेत दोन दिवसात बदल; भाजप खासदार भामरे
Published on

धुळे : राज्‍यात सध्‍या सुरू असलेल्‍या राजकिय घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार पडणार अशी चर्चा सुरू आहे. अशात भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांनी प्रतिक्रीया देताना राज्‍यातील सत्‍तेत दोन दिवसात बदल होणार असल्‍याचे मत मांडले आहे. (dhule news Change of state power in two days statement in BJP MP subhash Bhamre)

Subhash Bhamre
खापरखेडा शिवारात बिबट्याचा वावर; शेतकरी, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

राज्‍यातील विधान परिषदेच्‍या निवडणूकीत (BJP) भाजपने महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) धक्‍का दिला आहे. यामुळे राज्‍यात भाजप कार्यकर्ते जल्‍लोष करत आहेत. त्‍यानुसार धुळ्यात देखील भाजपतर्फे जल्‍लोष करण्यात आला आहे. माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

शिंदेच्‍या बंडखोरीनतर जल्‍लोष

पुढील दोन दिवसात सत्तेत बदल दिसेल असे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले असून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. प्रामुख्‍याने शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर धुळ्यात भाजपचा जल्लोष करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com