खापरखेडा शिवारात बिबट्याचा वावर; शेतकरी, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

खापरखेडा शिवारात बिबट्याचा वावर; शेतकरी, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
Leopard
Leopard Saam tv
Published On

पातोंडा (जळगाव) : पातोंडा (ता.अमळनेर) येथून आठ किमी अंतरावर असणाऱ्या खापरखेडा येथील शेतकरी प्रमोद पाटील यांच्या उसाच्या शेतात आज दुपारी अचानक बिबट्या (Leopard) दिसून आल्याने एकच तारांबळ उडाली. यामुळे शेतकऱ्यांमधे (Farmer) भितीचे वातावरण पसरले आहे. (jalgaon news Leopard roaming in Khaparkheda aria Farmers alert)

Leopard
Dhule: आमदार मंजुळा गावित देखील नॉटरिचेबल

पातोंडा येथील प्रमोद पाटील व त्यांची पत्नी हे सोमवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास शेतात पिकांची पहाणी (Jalgaon News) करण्यास गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या पुढ्यात बिबट्याने उडी घेत शेतात प्रवेश केल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. प्रमोद पाटील यांनी सदर घटनेची बाब पारोळा (Parola) वनपरीक्षेत्र अधिकारी शामकांत देसले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले, वन परिमंडळ अधिकारी अमळनेर (Amalner) पी. जे. सोनवणे, आर. बी. भदाणे, वनरक्षक आर. एस. वेलसे, श्रीमती. देवरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली.

बिबट्याच्‍या पाऊलखुणा

घटनेची सत्यता पडताळून पाहिली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतातील व परीसरातील पदचिन्हांची खात्री करून सदर पावलांच्या खुणा ह्या बिबट्याच्याच असल्याची खात्री करून तो तापी नदीच्या दिशेने गेला असल्याची माहिती दिली. वनविभागातील अधिकाऱ्यांनी गावात जाऊन गावकऱ्यांना व शेजारील गंगापूरी, नालखेडा, मठगव्हाण व नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

दोन अज्ञातांवर प्राणघातक हल्ला

दरम्यान खापरखेडा शिवारात रान डूक्करांची शिकार करायला गेलेल्या इसमांपैकी दोन इसमांवर बिबट्याने प्राणघाती हल्ला केल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे. यापैकी एक गंभीर जखमी असल्याचे समजते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर अज्ञात इसमांचा शोध घेतला असता ते फरार झाले असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com