Dhule News
Dhule NewsSaam tv

Dhule News: गाडी थांबताच साधली संधी..देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर दरोडेखोरांची दगडफेक

गाडी थांबताच साधली संधी..देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर दरोडेखोरांची दगडफेक
Published on

धुळे : उज्जैन येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला दरोडेखोरांकडून वाहनावर दगडफेक करून त्याचबरोबर चाकूचा धाक दाखवून (Robbery) लुटण्यात आले आहे. हा प्रकार धुळे (Dhule) तालुक्यातील आर्वी या ठिकाणी घडला आहे. (Breaking Marathi News)

Dhule News
Nanded News: इथं भरतो गाढवांचा सर्वात मोठा बाजार; जपली जातेय अनोखी परंपराही

उज्जैन येथून दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांचे वाहन धुळे (Dhule News) तालुक्यातील आर्वी या ठिकाणी काही वेळासाठी थांबले. याचवेळी पहाटेच्या दरम्यान काही दरोडेखोरांनी वाहनावर अचानकपणे दगडफेक करत वाहनाच्या (Crime News) काचा फोडल्या. त्याचबरोबर वाहनात बसलेल्या भाविकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेला ऐवज लुटून घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

दोन भाविक जखमी

पोलिसांना या संदर्भातील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. या वाहनातील भाविकांपैकी दोन भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले असून या दरोडेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com