Dharashiv : धाराशिवमध्ये ३ पिढ्यांचा अंत, दिवाळीची रात्र काळरात्र ठरली, ६ जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं कारण आलं समोर

Dharashiv Fire Tragedy Update News : धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात मध्यरात्री भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. एक जण बचावला असून अग्निशमन दलाच्या उशिरा येण्यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
Dharashiv Yadshi News
Dharashiv Yadshi News AI Image
Published On: 

धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण सुदैवाने बचावला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील एका किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. मध्यरात्री अचानक घराला आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले. घरात झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. धुरामुळे गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेतून एक व्यक्ती बचावल्याची माहिती आहे.

Dharashiv Yadshi News
Married Life Tips : पती-पत्नीमध्ये किती वयाचे अंतर असावे? यशस्वी आणि सुखी संसाराचं गणित समजून घ्या

आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आले. मात्र, अग्निशमनची गाडी उशिरा पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गाडीमध्ये पुरेसे पाणी नव्हते आणि डिझेलचीही कमतरता होती. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतः डिझेल उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. अग्निशमन कर्मचाऱ्यांकडे आवश्यक सुरक्षा साहित्यही नव्हते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Dharashiv Yadshi News
Oil Price Crash : कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या

अग्निशमन दल वेळेत पोहोचले असते, तर काहींचे प्राण वाचले असते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धाराशिव शासकीय रुग्णालयात चार जणांना मृत अवस्थेत आणण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Dharashiv Yadshi News
Pune : पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक; 825 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्रतापसिंह पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. येडशीतील दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात तेरखेडा येथे मोठे फटाका केंद्र असताना दिवाळीच्या काळात आगीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाने पुरेशी तयारी ठेवणे गरजेचे होते. मग आवश्यक साधनसामग्रीशिवाय अग्निशमन दल कसे काम करत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.