बालाजी सुरवसे
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. (Dharashiv News) काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. कळंब (Kalamb) तालुक्यात इटकूर गावातील ९ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला आहे. तर विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. (Live Marathi News)
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. याच दरम्यान धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असुन कळंब तालुक्यातील ईटकुर व परीसरातील गावातील तब्बल १५ मराठा बांधवांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केल आहे. तर गावातील ९ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तर गावातील शालेय विद्यार्थ्यांनी शालेय परिक्षांवर बहिष्कार टाकला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तोपर्यंत अन्नत्याग
धाराशिव जिल्ह्यात देखील आता आंदोलन उभारण्यात आले आहे. जोपर्यंत (Maratha Aarkshan) मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आम्ही अन्नत्याग करत आमरण उपोषण सुरू ठेवणार; असा निर्धार समाज बांधवांनी केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.