Maval News: आमच्याकडे जमीन नाही, नोकरी नाही जगायचं कस; मावळच्या किवळे मामुर्डी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन

Maval News : आमच्याकडे जमीन नाही, नोकरी नाही जगायचं कस; मावळच्या किवळे मामुर्डी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : मराठा आरक्षण आंदोलन सर्वत्र केले जात आहे. या दरम्यान एक मराठा लाख मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अश्या घोषणा सध्या पुणे- मुंबई एक्स्प्रेस लगत असलेल्या (Maval) किवळे मुकाई चौकात सकल मराठा समाजाच्या सुरू आहेत. यात शेतकऱ्यांनी देखील सहभागी झाले आहेत. (Breaking Marathi News)

Maval News
Maval Crime News: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवत लुटमार; एलसीबी पथकाकडून तीनजण ताब्यात

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठा समाज पेठून उठला आहे. आज किवळे मुकाई चौकात किवळे ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. तर मामुर्डी गावातही शेतकऱ्यांनी (Farmer) साखळी उपोषण केले आहे. आमच्याकडे शंभर शंभर एकर जमिनी होत्या. त्या आता गुंठ्यावर आलेले आहे. आमचे मुलं ९० टक्के मार्क घेतात. नोकरी कशी लागणार सभागृहात साठ टक्केपेक्षा जास्त मराठा समाजाचे आमदार आहे. आवाज का उचलत नाही? असा सवाल सरकारला उपोषणकर्त्यांनी विचारला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maval News
Bus Accident: अनियंत्रित डंपरची बसला धडक; सुदैवाने विद्यार्थी बचावले

गावबंदीही केली 

दरम्यान उपोषणकर्त्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढारी यांनी किवळे गावात पाय ठेवला तर याद राखा; असा इशाराच सकल मराठा समाजाने सरकारला दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com