बालाजी सुरवसे
धाराशिव : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाकडून काही भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यानुसार संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ (Drought) जाहीर करावा; यासह अन्य काही मागण्यासाठी (Dharashiv News) राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)
धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रलंबित पिकविमा देण्यात यावा, कर्जमाफी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला. या मागणी घेऊन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सरकार विरोधात घोषणाबाजी
दरम्यान जनआक्रोश आंदोलन करतेवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.