

बालाजी सुरवसे, प्रतिनिधी...
Accident News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची मालिका सुरू आहे. नुकताच धाराशीवच्या हैद्राबाद सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच दुसरी घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिकच्या येवला नांदगाव (Yavla- Nandgaon Road) रस्त्यावर दोन मोटार सायकलींमध्ये हा अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार झाला.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, हैद्राबाद-सोलापूर महामार्गावर नळदुर्ग येथील वळण रस्त्यावर मोटारसायकल व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. बालाजी चव्हाण व ईश्वर गायकवाड या दोन तरूण ठार झाले आहेत.
अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. दरम्यान घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल होत तपास सूरू केला या अपघातामध्ये ठार झालेल्या युवकांची अद्याप ओळख पटलेली नाही.दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (Dharashiv Accident)
नाशिकमधून (Nashik) अशीच एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावरील मळूबाईच्या घाटालगत दोन दुचाकींमध्ये समोरा-समोर धडक झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमीला येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतव्यक्ती हा नांदगाव तालुक्यातील भवरी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.