Beed News : बीडमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी गावकरी आक्रमक, नेमकं काय आहे प्रकरण?

बीडमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी गावकरी आक्रमक, नेमकं काय आहे प्रकरण?
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

बीड : रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी आष्टी -अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग बीडच्या धानोरा येथे अडवण्याचा प्रयत्न केला. बीडच्या आष्टी तालुक्यातील धानोरा- वाहीरा या सहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

या रस्त्यावरून जाताना अनेकांचे बळी जात असल्याने प्रशासनाला तक्रारी देऊनही काहीच होत नाही. म्हणून संतापलेल्या गावकऱ्यांनी आष्टी अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांना ताब्यात घेतले. परंतु, जोपर्यंत रस्ता दुरुस्त होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

Beed News
Rohit Pawar Statement : खातेवाटप म्हणजे रुसवा फुगव्‍याचा खेळ; आमदार रोहित पवार यांचा टोला

दोन महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; रस्त्याअभावी उशिरा मिळाले उपचार

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड व वाडा तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या म्हसेपाडा गावाची अवस्था (Palghar) अतिशय दयनीय आहे. खराब रस्‍त्‍यामुळे दोन महिन्‍यांच्‍या बालिकेचा मृत्‍यू झाला आहे. रस्‍ता खराब असल्‍याने उपचार वेळेवर न मिळाल्‍याने मृत्‍यू झाला आहे. (Breaking Marathi News)

पालघर जिल्‍ह्यातील अनेक भागांत पावसाळ्यातील चार महिने गावाला दोन नद्यांचा वेढा असतो. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून पोहून किंवा टायरच्या ट्युबच्या मदतीने नदी पार करावी लागते. येथील विद्यार्थिनी व गावांतील नागरिकांना प्रवास करावा लागतो. याबाबतची बातमी साम टीव्हीने गेल्या वर्षी १३ जुलैला प्रसारीत केली होती.

Beed News
Sambhajinagar Crime News : मुली देखतच व्यसनी पतीकडून पत्नीचा खून

आज याच पाड्यातील बालिकेला रस्ता नसल्याने वेळवर उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. या पाड्यातील लोकांना पूल किंवा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी (Wada) आणखी किती जणांचा बळी जाऊन देण्याची वाट शासन बघत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com