Sambhajinagar Crime News : मुली देखतच व्यसनी पतीकडून पत्नीचा खून

मुली देखतच व्यसनी पतीकडून पत्नीचा खून
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : दारू आणि गांजाचे व्यसन असलेल्या पतीने बॅट आणि चाकूने वार करत पत्नीचा खून (Crime News) केल्याची घटना कांचनवाडी परिसरात घडली आहे. या निर्घृण हत्येच्या घटनेने (Sambhaji nagar) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Sambhajinagar Crime News
Eknath Khadse Statement : भाजपमधून कोणी काँग्रेसमध्ये गेले तर आश्चर्य वाटू नये; राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

संगीता सुखदेव सोलनकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुखदेव बापूराव सोलंकर असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाले. त्यानंतर पतीने आपल्या पत्नीच्‍या डोक्‍यात बॅट आणि चाकूने हल्ला करून खून केला. त्यानंतर मुलीने आरडा- ओरड केल्यानंतर आरोपीने धूम ठोकली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar Crime News
Rohit Pawar Statement : खातेवाटप म्हणजे रुसवा फुगव्‍याचा खेळ; आमदार रोहित पवार यांचा टोला

आरोपीला तीन बायका

सदर खूनाच्‍या गुन्‍ह्यातील आरोपी असलेला सुखदेव सोलंकर यास तीन बायका असल्‍याची माहिती समोर आली आहे. मुलगा होत नसल्‍याच्‍या कारणातून आरोपीने तीन लग्‍न केले आहेत. पत्‍नीचा खून करून फरार झालेल्‍या पतीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com