Dharashiv : तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट, धाराशिवमधील धक्कादायक घटना; फोटो पाहून अंगावर काटा येईल

Dharashiv Mobile Blast News : धाराशिवमध्ये एका व्यक्तीच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला. प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली असून संबंधित व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.
MOBILE PHONE EXPLODES IN MAN'S POCKET DURING MEETING IN DHARASHIV, MAJOR ACCIDENT AVERTED
MOBILE PHONE EXPLODES IN MAN'S POCKET DURING MEETING IN DHARASHIV, MAJOR ACCIDENT AVERTEDSaam tv
Published On
Summary
  • धाराशिवमध्ये खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट

  • घटना गुरु सिद्धेश्वर विरक्त मठातील बैठकीदरम्यान घडली

  • मोबाईल बाहेर फेकल्याने मोठी दुर्घटना टळली

  • कपड्यांना आग लागून हाताच्या बोटाला व मांडीला किरकोळ दुखापत

बालाजी सुरवसे, धाराशिव

आपण जगातील कुठल्याही टोकाला असलो तरी प्रगत तंत्रज्ञानामुळे जवळच्या व्यक्ती पर्यंत जोडलो जातो. मोबाईल सारख्या गॅजेट्समुळे सहज संवाद साधणं तितकंच सोपं झालं आहे. अनेकांना मोबाईल फोन जवळ नसेल तरीही चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. मात्र हा फोन जितका फायदेशीर आहे, तितकाच तो हानिकारक देखील. अशीच एक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना धाराशिवच्या गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात घडली आहे. या मठात गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या नियोजनासाठी बैठक सुरु होती. बैठक सुरू असताना दक्षिण जेवळी येथील सोमनाथ वसंत गुंजोटे यांच्या खिशातून अचानक धूर निघू लागला आणि क्षणातच मोबाईलचा स्फोट झाला.

MOBILE PHONE EXPLODES IN MAN'S POCKET DURING MEETING IN DHARASHIV, MAJOR ACCIDENT AVERTED
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध
MOBILE PHONE EXPLODES IN MAN'S POCKET DURING MEETING IN DHARASHIV, MAJOR ACCIDENT AVERTED
MOBILE PHONE EXPLODES IN MAN'S POCKET DURING MEETING IN DHARASHIV, MAJOR ACCIDENT AVERTEDSaam Tv

प्रसंगावधान राखत त्यांनी जळत असलेला मोबाईल तातडीने खिशातून बाहेर फेकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत त्यांच्या कपड्यांना आग लागून शर्ट व पॅन्टचा काही भाग जळाला असून हाताच्या बोटाला आणि मांडीला किरकोळ इजा झाली आहे.

MOBILE PHONE EXPLODES IN MAN'S POCKET DURING MEETING IN DHARASHIV, MAJOR ACCIDENT AVERTED
Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

उपस्थित नागरिकांनी तात्काळ आग विझवत त्यांना स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक अंदाजानुसार, हा स्फोट फोनच्या अति वापरामुळे किंवा मोबाईलमधील बॅटरी गरम झाल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com